एक शिक्षक. अतिशय हुशार, हरहुन्नरी, विद्यार्थीप्रिय... हुकुमशाही या विषयावर मुलांना आठवड्याभराचं प्रोजेक्ट करायला देतो. तो स्वतःही त्यात पूर्णपणे सहभागी होणार असतो. हुकुमशाही चांगली की वाईट? फायदे काय अशा चर्चेने सुरुवात होते. दोन्ही बाजूची मतं येतात. हळूहळू फायदे जास्त जाणवायला लागतात. एकता, शक्ती, अभिमान, शिस्त, संघटनेची ताकद, सगळे समान पातळीवर, उच्चनीच भेदभावाला नसलेला थारा अशी अनेक गुणवैशिष्ठ्य निघतात. विद्यार्थ्यांन आकर्षण वाटायला लागतं, हुकुमशाही आपलीशी वाटायला लागते. रोजच्या तासाला हे हुकुमशाहीचे पुरस्कर्ते एकेक पाऊल पुढे टाकायला लागतात. एकच गणवेश, उभं राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, शिक्षकांना बोलावण्याची पद्धत, संघटनेचं नाव, लोगो, एकमेकांना अभिवादन करायची पद्धत सगळं सगळं ठरून जातं.
एकीकडे या सगळ्याला एक सुक्ष्मसा विरोधही व्हायला लागतो. "इफ यु आर नॉट विथ अस, यु आर विथ देम" हा हुकुमशाहीचा ठरलेला नियम वापरून विरोधकांना अलग पाडलं जातं, अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल जाते. हळूहळू त्या वर्गाबाहेरही या ग्रुपचं नाव पसरतं. शेजारच्या वर्गातली काही मुलं या वर्गात प्रवेश घेतात, अनेक मुलं धडपडत असतात. बघताबघता ग्रुपचं नाव हायस्कूलच्या बाहेर पसरतं, ग्रुपचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवली जाते. वागण्याला ताळतंत्र राहत नाही, मुलं हाताबाहेर जातात... आणि अचानक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी........ !!!!!
म्हटलं तर प्रतिकात्मक म्हटलं तर थेट पद्धतीने हुकुमशाहीवर भाष्य करणारा 'द वेव्ह' हा जर्मन चित्रपट. हिटलरच्या हुकुमशाहीचा काळा भूतकाळ सदैव पाठीवर बाळगणाऱ्या जर्मनीतल्या एका शाळेतलं वातावरण दाखवल्याने अधिकच वास्तव वाटू शकणारा. 'द वेव्ह' या हुकुमशाही ग्रुपची निर्मिती होत असतानाचे जे सुरुवातीचे प्रसंग आहेत ते हुकुमशाहीचा जन्म कसा होतो (होत असावा) यावर अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाष्य करतात. ग्रुपचं नाव ठरवताना द बेस, द पॅक्ट, द राईझन अशी ग्रुपचं आणि पर्यायाने हुकूमशाहीचं उदात्तीकरण करणारी नावं सुचवली जातात तो प्रसंग, किंवा ग्रुपचा गणवेश न पाळणाऱ्याला एकटं पाडण्याचा प्रसंग, अभिवादन करायला नकार दिल्यावर मिळणारी वागणूक दाखवणारा प्रसंग असे अनेक छोटे छोटे प्रसंग हुकूमशाही मानसिकता आणि तिच्या परिणामांवर खणखणीत प्रहार करतात. विचार करायला प्रवृत्त करतात.
सर्वात कहर म्हणजे हे हुकुमशाहीचे प्रयोग आणि त्याचे परिणाम डोळ्यासमोर दिसत असतानाही शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून त्याला आडकाठी किंवा विरोध होण्याऐवजी त्यांच्या दिखाऊ फायद्यांकडे बघून उलट त्या शिक्षकाचं कौतुकच केलं जातं. हुकुमशाहीचा वणवा एकदा पसरला की त्यामुळे होणाऱ्या तात्पुरत्या फायद्यांमुळे तिच्या दुष्परिणामांकडे थेट डोळेझाक करण्याच्या उच्चपदस्थियांच्या प्रवृत्तीकडे निर्देश करणारा अप्रतिम प्रसंग.. पण सर्वात बोलका आणि परिणामकारक प्रसंग म्हणजे चित्रपटाचा अखेरचा प्रसंग. त्यातल्या घडामोडी, त्या शिक्षकाचं भाषण, कबुलीजबाब, विचार हे सगळं सगळं फार अप्रतिमरीत्या दाखवलेलं आहे. सुरुवातीला खेळ म्हणून सुरु केलेल्या या प्रकारात अजाणतेपणी आपण स्वतःही कसे गुंतत गेलो हे तो शिक्षक सांगतो, मुलांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो हे सगळेच प्रसंग दिग्दर्शक डेनिस गान्सेलने अत्यंत परिणामकारकरीत्या उभे केले आहेत.
थोडक्यात लोकशाहीचा निषेध करणाऱ्या आणि हुकूमशाहीचे गोडवे गाणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून पहावी अशी ही हुकुमशाहीची ला(थ)ट काहीही झालं तरी न चुकवण्यासारखी आहे. आवर्जून पहाच.. !!