Friday, April 9, 2021

बंदिवान मी : What Ever Happened to Baby Jane? आणि Run


नुकतेच दोन अप्रतिम चित्रपट बघितले. मध्यवर्ती संकल्पना (basic theme) एकसारखीच असलेले. पण अगदी योगायोगाने. दोन्हींची संकल्पना जवळपास एकसारखीच आहे हे अजिबात माहित नव्हतं. पहिला म्हणजे 'What Ever Happened to Baby Jane?'. हा एका चित्रपट समूहावर कळला. तर दुसरा म्हणजे एकाने सुचवलेला Hulu Original चा गेल्यावर्षीचा 'Run'. आपल्या अतिशय जवळच्या(!) व्यक्तीवर' काहीएक कारणाने फार मोठा अन्याय करणे, त्रास देणे ही प्राथमिक संकल्पना. अर्थात दोन्हींमध्ये अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे हेतू वेगवेगळे असले आणि त्यांच्या अशा प्रकारे वागण्याचं त्यांनी केलेलं समर्थनही अगदीच भिन्न पद्धतीचं असलं तरीही दोन्हींमध्ये अन्यायग्रस्त व्यक्तीवर होणारा परिणाम, तिला होणारा त्रास हा बाह्यदर्शनी जवळपास सारखाच. दोन्ही चित्रपटांत प्रमुख पात्रं म्हणून दोन स्त्रिया आहेत हे अजून एक साम्य. Baby Jane हा त्याकाळच्या बेटी डेव्हिस सारख्या तगड्या नावामुळे सुप्रसिद्ध असला तरी कालानुरूप किंचित विसंगत वाटू शकतो. तर Run मध्ये सॅरा पॉल्सन उल्लेखनीय. 

जाता जाता : Run चा दिग्दर्शक आणि सहलेखक असलेल्या अनीश चगंतीचा २०१८ साली आलेला Searching ही अजिबात न चुकवण्यासारखाच.