Tuesday, August 21, 2012

हुकूमशाहीची ला(थ)ट !!.... द वेव्ह..

एक शिक्षक. अतिशय हुशार, हरहुन्नरी, विद्यार्थीप्रिय... हुकुमशाही या विषयावर मुलांना आठवड्याभराचं प्रोजेक्ट करायला देतो. तो स्वतःही त्यात पूर्णपणे सहभागी होणार असतो. हुकुमशाही चांगली की वाईट? फायदे काय अशा चर्चेने सुरुवात होते. दोन्ही बाजूची मतं येतात. हळूहळू फायदे जास्त जाणवायला लागतात. एकता, शक्ती, अभिमान, शिस्त, संघटनेची ताकद, सगळे समान पातळीवर, उच्चनीच भेदभावाला नसलेला थारा अशी अनेक गुणवैशिष्ठ्य निघतात. विद्यार्थ्यांन आकर्षण वाटायला लागतं, हुकुमशाही आपलीशी वाटायला लागते. रोजच्या तासाला हे हुकुमशाहीचे पुरस्कर्ते एकेक पाऊल पुढे टाकायला लागतात. एकच गणवेश, उभं राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, शिक्षकांना बोलावण्याची पद्धत, संघटनेचं नाव, लोगो, एकमेकांना अभिवादन करायची पद्धत सगळं सगळं ठरून जातं.



एकीकडे या सगळ्याला एक सुक्ष्मसा विरोधही व्हायला लागतो. "इफ यु आर नॉट विथ अस, यु आर विथ देम" हा हुकुमशाहीचा ठरलेला नियम वापरून विरोधकांना अलग पाडलं जातं, अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल जाते. हळूहळू त्या वर्गाबाहेरही या ग्रुपचं नाव पसरतं. शेजारच्या वर्गातली काही मुलं या वर्गात प्रवेश घेतात, अनेक मुलं धडपडत असतात. बघताबघता ग्रुपचं नाव हायस्कूलच्या बाहेर पसरतं, ग्रुपचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवली जाते. वागण्याला ताळतंत्र राहत नाही, मुलं हाताबाहेर जातात... आणि अचानक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी........ !!!!!

म्हटलं तर प्रतिकात्मक म्हटलं तर थेट पद्धतीने हुकुमशाहीवर भाष्य करणारा 'द वेव्ह' हा जर्मन चित्रपट. हिटलरच्या हुकुमशाहीचा काळा भूतकाळ सदैव पाठीवर बाळगणाऱ्या जर्मनीतल्या एका शाळेतलं वातावरण दाखवल्याने अधिकच वास्तव वाटू शकणारा. 'द वेव्ह' या हुकुमशाही ग्रुपची निर्मिती होत असतानाचे जे सुरुवातीचे प्रसंग आहेत ते हुकुमशाहीचा जन्म कसा होतो (होत असावा) यावर अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाष्य करतात. ग्रुपचं नाव ठरवताना द बेस, द पॅक्ट, द राईझन अशी ग्रुपचं आणि पर्यायाने हुकूमशाहीचं उदात्तीकरण करणारी नावं सुचवली जातात तो प्रसंग, किंवा ग्रुपचा गणवेश न पाळणाऱ्याला एकटं पाडण्याचा प्रसंग, अभिवादन करायला नकार दिल्यावर मिळणारी वागणूक दाखवणारा प्रसंग असे अनेक छोटे छोटे प्रसंग हुकूमशाही मानसिकता आणि तिच्या परिणामांवर खणखणीत प्रहार करतात. विचार करायला प्रवृत्त करतात.

सर्वात कहर म्हणजे हे हुकुमशाहीचे प्रयोग आणि त्याचे परिणाम डोळ्यासमोर दिसत असतानाही शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून त्याला आडकाठी किंवा विरोध होण्याऐवजी त्यांच्या दिखाऊ फायद्यांकडे बघून उलट त्या शिक्षकाचं कौतुकच केलं जातं. हुकुमशाहीचा वणवा एकदा पसरला की त्यामुळे होणाऱ्या तात्पुरत्या फायद्यांमुळे तिच्या दुष्परिणामांकडे थेट डोळेझाक करण्याच्या उच्चपदस्थियांच्या प्रवृत्तीकडे निर्देश करणारा अप्रतिम प्रसंग.. पण सर्वात बोलका आणि परिणामकारक प्रसंग म्हणजे चित्रपटाचा अखेरचा प्रसंग. त्यातल्या घडामोडी, त्या शिक्षकाचं भाषण, कबुलीजबाब, विचार हे सगळं सगळं फार अप्रतिमरीत्या दाखवलेलं आहे. सुरुवातीला खेळ म्हणून सुरु केलेल्या या प्रकारात अजाणतेपणी आपण स्वतःही कसे गुंतत गेलो हे तो शिक्षक सांगतो, मुलांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो हे सगळेच प्रसंग दिग्दर्शक डेनिस गान्सेलने अत्यंत परिणामकारकरीत्या उभे केले आहेत.

थोडक्यात लोकशाहीचा निषेध करणाऱ्या आणि हुकूमशाहीचे गोडवे गाणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून पहावी अशी ही हुकुमशाहीची ला(थ)ट काहीही झालं तरी न चुकवण्यासारखी आहे. आवर्जून पहाच.. !!

12 comments:

  1. जबरी परीक्षण .... पाहायलाच पाहिजे ...
    शाळेत असताना हिटलर आणि हुकुमशाही हवीच अस मत होत तेव्हा ...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सचिन. नक्की बघ. कधी कधी रागाच्या भरात आपण लोकशाहीला शिव्या घालतो पण खरंच हुकुमशाही आली तर विचारही करू शकणार नाही इतके भीषण परिणाम होतील !

      Delete
  2. भारी आहे ! शोधते आता !

    ReplyDelete
  3. प्रिय हेरंब,

    नमस्कार!
    तुझे अप्रतिम लेख नेहेमी वाचतो पण मूळच्या आळशी स्वभावाने 'उद्या नक्की comment टाकतो' असे करत तो 'उद्या' कधी येतच नाही. आज स्वत:ला दामटून बसवून लिहायला घेतले आणि लक्षात आले की 'उद्या' येणार म्हणताना 'आज'च आला की ("आपणही काही कमी नाही शाब्दिक कोटी करण्यात, मनात आणलं तर दहा ब्लॉग......" असो).

    मी हा चित्रपट आधी पहिला होता आणि खूप अस्वस्थही झालो होतो. (याचे कारण म्हणजे मी काही प्रमाणात ती परिस्थिती स्वत: अनुभवली आहे. काही संघटनांच्या कामात काही वर्षे, तीही विशेषत: संस्कारक्षम वयातली, घालवल्यावर माझेही विचार, आचार rigid झाले होते. त्यातून बाहेर येताना तो ट्रांस जाणवला) ते सगळे यानिमित्ताने आठवले. या चित्रपटाचे विश्लेषण तू इतक्या चपलख शब्दांत सहजपणे मांडले आहेस की हे लिहिल्यावाचून राहवले नाही..

    तूला असेच भारी लिहिता यावे म्हणून काही हटके चित्रपटांची नावे देतोय, नक्की पहा (पाहिले असतील तर ल. तों. मो.घा. घेतल्याबद्दल क्षमस्व) आणि जमल्यास नक्की लिही त्यावर..

    - The man from earth
    - The fish
    - K-pax
    - 12 Angry men
    - How to kill a mockingbird
    - Freedom writers
    - A bridge too far
    - Animal farm (animated)

    कळावे,
    अक्षय

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय अक्षय,

      तुला ब्लॉगवर बघून सुखद धक्का बसला :). आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आणि ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत..

      >> काही संघटनांच्या कामात काही वर्षे,
      मला कल्पना आहे तू कशाबद्दल बोलतो आहेस ते. माझ्या मते आपण सगळेच (डोंबिवलीकर) या अशा विचार रिजिड होण्याच्या अनुभवातून थोड्या फार प्रमाणात का होईना पण गेलो आहोत !

      तू दिलेल्या यादीतले चित्रपट खरंच एकापेक्षा एक सरस आहेत. शेवटचे तीन मी बघितले नाहीयेत पण "All animals are equal but some are more equal than others" हे त्रिकालाबाधित सत्य मांडणारं जॉर्ज ऑरवेलचं पुस्तक कधीपासून वाचायचं आहे (कधी योग येतोय कल्पना नाही). चित्रपटही नक्कीच बघेन.

      big fish, k-pax, man from earth, how to kill a mocking bird हे सगळे अतिशय ग्रेट आहेतच पण 12 Angry men माझा अत्यंत अत्यंत अत्यंत विशेष आवडता चित्रपट आहे. तो मी किती वेळा बघितला आहे याची गणनाच नाही. मागे एकदा माझ्या दुसऱ्या ब्लॉगवर या चित्रपटाविषयी लिहिलं होतं. (थोडं पाल्हाळ आहे :) )

      http://www.harkatnay.com/2010/02/blog-post_10.html

      तुझ्या अजून आवडत्या चित्रपटांची नावं सुचवलीस तर आवडेल. :)

      Delete
  4. सॉरी, The fish नसून Big fish असे नाव आहे. यावरून The Dish नावाचा आणि एक हटके चित्रपट आठवला.. 'कपटवेषात आशीर्वाद' (मराठीत blessing in disguise) म्हणतात ते असे.. :)

    ReplyDelete
    Replies
    1. कपटवेषात आशीर्वाद !!! अतिप्रचंड भारी.. हाहाहा :))))

      Delete
  5. Movie works excellently on intellectual front when it tackles and shows the efforts of Wenger on his students and his own marital life along with the dual between the ego and conscience of the witnesses to the scenario.The only thing I didn't liked about the movie was it imposes the conclusion on the viewer rather than asking the question to the one,which was quite disappointing to the built up of the story.
    Otherwise movie was fantastic do watch directors before the fall too,another nice movie by gansel

    ReplyDelete
    Replies
    1. Yupp. Agree with you. He has concluded it with clear black n white. But still I loved that too. Another most imp thing I loved is the maintained length and pace of the movie. That was wonderful.

      Am gonna watch 'Before the Fall' pretty soon. thanks.

      Delete