अघळपघळ, बटबटीत, चपखल, शार्प अशा अनेक प्रकारच्या संवादांनी नटलेले चित्रपट आपण नेहमी बघतो. किंबहुना संवाद हा चित्रपटाच्या यशस्वितेसाठीचा अविभाज्य घटक मानला जातो. परंतु फ्रेंच दिग्दर्शक जॉं पेर मेल्विलला हे तितकसं मान्य नसावं. किंवा निदान त्याच्या ' ल' सामुराई ' या चित्रपटापुरतं तरी नक्कीच. म्हणजे हा काही मुकपट आहे असं नव्हे. संवाद आहेतच. पण अगदी अगदी तोलून-मोजून-मापून वापरल्यासारखे.आणि तेही जिथे अगदी अगदी अत्यावश्यक आहेत तेवढ्याच प्रसंगांत आणि तेही अगदी कमीत कमी शब्दांत संपणारे (अपवाद एक-दोन प्रसंग).
ही कहाणी आहे एका अतिशय चलाख, चतुर अशा काँन्ट्रॅक्ट किलरची. काम (गुन्हा) करण्याची त्याची स्वतःची अशी एक ठरलेली, आखून घेतलेली, बिनचुक अशी प्रक्रिया आहे. पाठलाग, हत्यार, खून कसा आणि कुठे करायचा, गुन्ह्यानंतर वाहनाचा पुरावा नष्ट कुठे करायचा वगैरे सगळ्याची त्याची एक ठरलेली पद्धत आहे. पण एवढं सगळं नीटनेटकं प्लानिंग असूनही एका प्रसंगात काहीतरी बिनसतं आणि पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागतो. असो. तर कथेचा जीव त्यामानाने अगदीच छोटा आहे. यात कथेला विशेष महत्व नाहीये की वर म्हटल्याप्रमाणे संवादांना. सगळा भर आहे तो फक्त आणि फक्त सादरीकरणावर. त्यापुढे कथा, पटकथा, संवाद, संगीत सगळं दुय्यम आहे.
अगदी छोट्यातल्या छोट्या हालचालीला, अगदी सामान्य घटनेला, प्रतिक्रियेला कॅमेरा टिपत राहतो आणि आपल्यापुढे मांडत राहतो. आणि त्या फ्रेमचा काही क्षणांनी आपल्याला लागणारा अर्थ पाहून आपण दिग्दर्शकाला आणि कॅमेरामनच्या कौशल्याला मनोमन सलाम करतो. अगदी महत्वाच्या प्रसंगांमध्ये घराचा पडदा, पिंजऱ्यातला पक्षी, त्याची हालचाल, आवाजातला बदल इत्यादी अगदी छोट्या छोट्या आणि बिनमहत्वाच्या गोष्टींचा अत्यंत कौशल्याने वापर केला आहे. तसंच पाठलाग, घराची झडती, नायकाला बंदी बनवणे, ओळख परेड असे अनेक शब्दबंबाळ होऊ शकणारे किंबहुना डायलॉगबाजीसाठी आदर्श म्हणून बघितले जाणारे प्रसंग या चित्रपटात कमीतकमी किंवा जवळपास शून्य शब्दांत चितारलेले आहेत. पण तरीही त्याची परिणामकारकता कुठेही कमी न होत नाही. उलट एकही संवाद न घडता अशा अनेक महत्वाच्या घटना एका मागोमाग एक घडत राहतात, चित्रपट वेगाने पुढे सरकत राहतो त्यामुळे उलट ही बिनसंवादांची पद्धत अधिकच परिणामकारक वाटते !
या सगळ्या शब्देविण संवादु प्रकाराला तशीच तोलामोलाची साथ दिली आहे ती अत्यंत बोलक्या डोळ्यांच्या, देखण्या, डॅशिंग अॅलन डेलन ने. त्याचं शार्प ड्रेसिंग, चॉकलेट हिरोसारखा चेहरा, भेदक नजर आणि एका व्यावसायिक गुन्हेगाराला शोभतील अशा कुशल हालचाली या सगळ्यांमुळे त्याच्या चित्रपटातल्या व्यक्तिमत्त्वाला अजूनच धार येते ! चित्रपटाचा शेवट काहीसा साधा, थोडासा अनपेक्षित आहे. पण तोपर्यंत आपण जो विलक्षण अनुभव घेतलेला असतो त्या अनुभावापुढे इतर सगळ्या गोष्टी दुय्यम असतात !!
असो.. आता थांबतो. कारण इतक्या कमी संवादांच्या चित्रपटाविषयी लिहिताना यापेक्षा अधिक शब्द वापरणं हा त्या चित्रपटाचा अपमान ठरेल ! 😊

--हेरंब ओक
No comments:
Post a Comment